दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू क्रिकेटर केशव महाराज धोतर नेसून मंदिरात

हिंदुस्थानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू केशव महाराज यांनी मधील थिरुवनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली. या खास क्षणाचा फोटोही त्याने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. पारंपरिक पद्धतीने धोतर घालून पूजा करताना केशव महाराजांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये त्याने सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत ‘जय माता दी’ असे लिहिले आहे. देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. नऊ दिवस हा शक्तीचा उत्सव साजरा होत आहे. अंबामातेची पूजा केली जात आहे. भाविक आनंदाने गरबा खेळताना दिसत आहेत. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच पाहुण्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर केशव महाराज याने चक्क केरळी धोती परिधान करीत थिरूवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली.