बापरे! एकाचवेळी 10 मुलांना जन्म, दक्षिण आप्रिकेतील महिलेची नोंद गिनीज बुकमध्ये होणार

दक्षिण आप्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिला आहे. गोसियामे थमारा सिथोले असे या महिलेचे नाव आहे. 37 वर्षीय सिथोले हिने 7 जून रोजी सात मुलांना आणि तीन मुलींना जन्म दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सिथोलेच्या नावाची नोंद गिनीज बुव ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.

सिथोलेचे पती तेबोहो त्सोतेत्सी यांनी बाळांच्या जन्मानंतर आपण आनंदी आणि भावुक झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्रिटोरिया येथील रुग्णालयात सिथोलेची सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसूती झाली. डॉक्टरांनी गरोदरपणा वेळी केलेल्या तपासणीत सहा मुले असल्याचे आम्हाला सांगितले होते. त्यानंतर आठ बाळं असल्याचे सांगितले. मात्र प्रसूती वेळी 10 बाळांचा जन्म झाला. या आप्रिकन जोडप्याला याआधी जुळी मुले आहे.

  • सध्या एकाच वेळी सर्वात जास्त मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड हलिमा निस्से या महिलेच्या नावाकर आहे. हलिमा हिने मे महिन्यात मोरक्कोच्या हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता.
आपली प्रतिक्रिया द्या