दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा; ज्योती गवतेला मॅरेथॉन स्पर्धेत कास्यपदक

616

नेपाळ येथे 13वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कांडमांडू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व करत ज्योती गवते हिने 42 कि.मी मॅरेथॉन स्पर्धेत कास्यपदक पटकावले. तसेच या स्पर्धेत श्रीलंकेच्या हिरुनी केसारा हिने सूवर्णपदक, तर रौप्यपदकाची मानकरी नेपाळच्या पुष्पा भंडारी ठरली आहे.

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता, हिंदुस्थानी तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, दिग्विजय (मध्यप्रदेश) ऑलिम्पिक सचिव यांनी केला. ज्योती गवतेला प्रशिक्षक रवी रासकटला यांचे मार्गदर्शन लाभले. ज्योती गवतेने आजपर्यंत थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि चीन सारख्या देशात हिंदुस्थानचे 6 वेळा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या