… तर ते न्यूड दृश्य चित्रित करूच शकले नसते, अभिनेत्रीचा खुलासा

27


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हॉलिवूड असो, बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड चित्रपटाचे कथेला न्याय देण्यासाठी अभिनेता, अभिनेत्री आणि चित्रपटाशी निगडीत लोकांना काही वेळा धाडसी निर्णय घ्यावा लागतो. याच निर्णयामुळे अनेकदा ते रातोरात स्टार होतात. शब्दांचा एवढा प्रपंच याचसाठी की सध्या एका चित्रपटातील दृश्य व्हायरल झाले आहे. या दृश्यामध्ये अभिनेत्रीने न्यूड सीन दिला आहे. तिच्या या धाडसी निर्णयाची अनेकांनी वाहवा केली आहे.

दिग्दर्शक रत्न कुमार यांचा दाक्षिणात्य चित्रपट ‘आदाई’चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. दीड मिनिटांच्या या टीझरमधील अभिनेत्री अमाला पॉल हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या काही सेकंदांच्या न्यूड सीनची चर्चा सध्या सुरू आहे. तिच्या या धाडसी निर्णयाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. याच संदर्भात अभिनेत्री ‘द हिंदू’ला एक मुलाखत दिली. यात तिने या दृश्याचे चित्रिकरण नक्की कशा प्रकारे झाले याची माहिती सांगितली.

अमालाला या सीनबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘चित्रपटातील हे दृश्य चित्रित करताना मी सेटवर पोहोचले तेव्हा माझ्या मनावर दडपण आले होते. सेटवर काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठीही माझ्या मनात चिंता होती. ते दृश्य चित्रित करताना सेटवर कोण उपस्थित असेल, वातावरण काय असेल याचाच मी विचार करत होते.’

दिग्दर्शकाने या दृश्यासाठी एका बंद सेटची व्यवस्था केल्याचे अमालाने सांगितले. ते दृश्य चित्रित करताना सेटवर 15 लोक उपस्थित होते. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास होता आणि या विश्वासामुळेच मी त्या दृश्याचे चित्रिकरण करू शकले, असा खुलासा अमालाने केला. दरम्यान, ‘आदाई’चा टीझर लोकांनी डोक्यावर घेतला आहे. आतापर्यंत जवळपास 93 लाख लोकांनी हा टीझर पाहिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या