
11. हंसिका मोटवानी
बालकलाकार म्हणून हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या हंसिकाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. इथे तिला चांगलं यश मिळालं असून ती एका चित्रपटासाठी अंदाजे 80 लाख ते 1 कोटींपर्यंत मानधन घेते.
10. त्रिशा कृष्णन
देशातील अत्यंत सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्रिशाचा समावेश होतो. खट्टा मिठ्ठा या हिंदी चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले आहे. मात्र त्यानंतर ती हिंदी चित्रपटात दिसली नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मात्र ती अत्यंत प्रसिद्ध असून एका चित्रपटासाठी ती अंदाजे 1 कोटी रुपये घेते.
09. इलियाना डिक्रूझ
दक्षिणेकडच्या चित्रपटांप्रमाणेच इलियाने हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. इलियाना एका चित्रपटासाठी अंदाजे 1 ते 1.5 कोटी रुपये मानधन घेते.
08. रकुलप्रीत सिंग
इलियानाप्रमाणेच रकुलचं नाव टॉलीवूड, मॉलीवूडप्रमाणेच बॉलीवूडलाही आता चांगलंच परिचित झालं आहे. रकुल दिसायला जेवढी सुंदर आहे तितकाच तिचा अभिनयही चांगला आहे. रकुल एका चित्रपटासाठी अंदाजे 1.5 ते 2 कोटी रुपये मानधन घेते.
07. श्रृती हसन
अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची मोठी मुलगी श्रृती हिने बॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावून पाहिलं. मात्र इथे तिला फारसं यश मिळालं नाही. असं असलं तरी दक्षिणेकडे तिला चित्रपटांसाठी प्रचंड मागणी आहे. श्रृती एका चित्रपटासाठी अंदाजे 2 कोटी रुपये मानधन घेते.
06. तापसी पन्नू
दक्षिणेकडच्या चित्रपटांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तापसी आता बॉलीवूडमध्ये स्थिरावली आहे. तिच्या अभिनयाचे बॉलीवूडमध्ये कौतुक झालं असून यामुळे तिने मानधन जास्त घ्यायला सुरुवात केल्याचं बोललं जातं. तापसी ही देखील श्रृतीप्रमाणेच अंदाजे 2 कोटी रुपये मानधन घेते.
05. तमन्ना भाटीया
या पंजाबी कुडीने दाक्षिणात्य चित्रपटप्रेमींना वेड लावलं आहे. तमन्नाने काही हिंदी चित्रपट देखील केले आहेत, मात्र तिची खरी ओळख ही दक्षिणेकडील चित्रपटांमुळेच आहे. तमन्ना ही देखील अंदाजे 2 कोटी रुपये मानधन घेते
04. नयनतारा
दिसायला अत्यंत सुंदर असलेली नयनतारा ही दक्षिणेकडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपूर्वी तिने ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतरण केले होते. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबत लग्न करण्यासाठी तिने हे धर्मांतरण केल्याची जोरदार चर्चा होती. नयनतारा ही एका चित्रपटासाठी अंदाजे 2-3 कोटी रुपये घेते.
03. काजल अग्रवाल
देशातील अत्यंत देखण्या अभिनेत्रींपैकी एक असलेली काजल अग्रवाल ही एका चित्रपटासाठी अंदाजे 3-5 कोटी रुपये मानधन घेते
02. समांथा रुथ प्रभू
अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी समांथाचा नुकताच विवाह झाला आहे. सौंदर्यासोबतच उत्तम अभिनय करणारी ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी अंदाजे 4-5 कोटी रुपये मानधन घेते
01 अनुष्का शेट्टी
बाहुबली चित्रपटामुळे देशभरातच नाही तर जगभरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. अनुष्का एका चित्रपटासाठी अंदाजे 6 ते 10 कोटी रुपये मानधन घेते.