साऊथस्टारची ट्विटरवर एन्ट्री, कोरोनाशी लढण्यासाठी 70 लाख रुपये मदतीची घोषणा

देश कोरोनाशी सामना करण्यासाठी एकजूट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे प्रत्येक शहरात, गावात तुरळक घटना वगळता लॉकडाऊन पाळला जात आहे. लोकांमध्ये जनजागृती वाढत असून यासाठी नेते, अभिनेते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. अनेक जण फोटो, व्हिडीओ शेअर करून लोकांना जागरूक करण्याचे काम करत आहेत. अशातच दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्याची सोशल मीडियावर एन्ट्री झाली असून त्याने आपल्या पहिल्याच पोस्ट मध्ये कोरोनाशी लढण्यासाठी 70 लाख रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर करत चाहत्यांचे मन जिंकले आहे.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार राम चरण याने ट्विटर अकाउंट सुरू केले आहे. राम चरण याचे अधिकृत ट्विटर हँडल @AlwaysRamCharan हे आहे. ट्विटरवर एन्ट्री होताच त्याच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढत आहे. चिरंजीवी सोशल मीडियाच्या माध्यमातून राम चरण याची ट्विटरवर एन्ट्री झाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राम चरण याचे वडील आणि दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांचे ट्विटरवर आगमन झाले आहे. आटा राम चरण याने देखील ट्विटर अकाउंट सुरू केले असून सध्या #RamCharanOnTwitter ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे.

ट्विटरवर एन्ट्री करताच राम चरण याने कोरोनाशी लढा देण्यासाठी 70 लाख रुपये दान देण्याची घोषणा केली. त्याने तेलगू राज्य आणि केंद्राच्या मदत निधीमध्ये 70 लाख दान केले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि मध्य प्रदेशकॅगे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या