सोयगाव तालुक्यात शिवसेनेची मुसंडी, 30 ग्रामपंचायतींवर भगवा

सोयगाव तालुक्यात भाजपला जोरदार धक्का देत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. ४० पैकी ३० ग्रामपंचायतींवर दणदणीत विजय मिळवला आहे. सोयगाव येथे शिवसेनेच्या वतीने विजयोत्सव साजरा करून विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे यांना त्यांच्या गावातच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या वर्षा हनुमंता लोखंडे यांनी येथे त्यांच्या पत्नीचा पराभव करीत विजय मिळवला.

सोयगाव तालुक्यात एकूण ४० ग्रामपंचायत ची निवडणूक झाली यातील २१ ग्रामपंचायती या महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड – सोयगाव मतदार संघात येतात. मतदार संघात येणाऱ्या २१ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला.

शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे, उस्मानखा पठाण, रमेश गव्हांडे, दिलीप देसाई, रवींद्र काटोले, भगवान वारंगणे, शेख रऊफ, अमोल मापारी, राजमल पवार, बाबू चव्हाण, शिवाप्पा चोपडे, सांडू तडवी, शेख बबलू, श्रावण चव्हाण, रशीद पठाण, समाधान काळे, विनोद तेली आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील डाभा येथील ग्रामपंचायत मध्ये वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता होती; मात्र या वेळी शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज केले.

सिल्लोड तालुक्यात 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दणदणीत विजय; भाजपला धक्का

आपली प्रतिक्रिया द्या