स्पेनच्या चर्चमधील गणपतीचे पूर्ण सत्य; बिशपची माफी- राजीनामा

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेशोत्सवादरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील एका चर्चचा असून त्यात गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसत आहे. स्पेनमध्ये स्थानिक हिंदूनी गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरवला आणि गणपतीची मिरवणूक काढली. एका चर्चच्या बिशपने ही मूर्ती चर्चमध्ये ठेवून दोन देवांची भेट घडवू असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्याता आला आहे. यातील काही अंश खरा असल्याचे निदर्शनास आले आहे. पण त्यानंतर झालेले वाद फार कमी जणांना माहित आहे.

गेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये स्थानिक हिंदूं समुदयाने गणेशोत्सव साजरा केला होता. या निमित्ताने गणपतीची मूर्ती अवर लेडी ऑफ आफ्रिका कॅथेड्रल चर्चमध्ये ठेवण्यात आली होती. याची परवानगी खुद्द फादर जुआन केस्ट्रो यांनी दिली होती. त्यांनी स्वतः चर्चची दारे उघडली आणि गणेश भक्तांचे स्वागत केले होते.
पण त्यानंतर चर्चच्या व्यवस्थापनाने फादरची याप्रकरणी चांगलीच कान उघडणी करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर चर्चचे बिशप राफाएल झोरनोझा बॉय यांनी एक पत्र जाहीर करून या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच असे करणे म्हणजे चूक आहे, यात फक्त आपण हिंदूंबद्दल आदर व्यक्त करायचा होता असे नमूद केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या