कोरोनामुळे शरिरामध्ये कसे बदल होत गेले, रुग्णाने सांगितला आपला अनुभव

9898

चीनच्या वुहान शहारातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा सर्वांनीच धसका घेतला आहे. आतापर्यंत 100 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून मृतांचा आकडाही वाढत आहे. चीनबाहेर कोरोना व्हायरस वेगाने पसरत असून हिंदुस्थानमध्येही या व्हायरसने पाय पसरले आहेत. गुरुवारी रात्री कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका 76 वर्षीय रुग्णाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे हिंदुस्थानमध्ये झालेला तो पहिला मृत्यू ठरला. तसेच 70 पेक्षा जास्त रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याच दरम्यान, कोरोना व्हायरसने शरिरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय बदल होतात याबाबत स्पेनमधील एका रुग्णाने आपला अनुभव शेअर केला आहे.

स्पेन देशातील मॅड्रिड शहरातील ‘यूनिवर्सिटारियो ला पाज’ या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात तैनात असणाऱ्या डॉक्टराला कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना त्यांच्या संपर्कात आल्याने डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. येल तुंग चेन असे या डॉक्टरांचे नाव असून कोरोना व्हायरसने शरिरात प्रवेश केल्यापासून त्यांनी सर्व लक्षणांचे अपडेट आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. लोकांमध्ये जागरुकता पसरावी आणि ते सावध व्हावे यासाठी डॉक्टरांनी आपला अनुभव शेअर केला.

CoronaVirus विरूद्धच्या लढ्यात हिंदुस्थानला मोठे यश, वाचा सविस्तर बातमी

कोरोनाची लागण झाल्यानंतर 35 वर्षीय डॉक्टर येल तुंग चेन घरातच आयसोलेशन (एकांतात)मध्ये राहात आहेत. यादरम्यान फुफ्फुसात आणि शरिरात होणाऱ्या बदलांची आणि वेदनांची माहिती डॉ. येल तुंग चेन लाईव्ह ट्विट करून देत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांना ज्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो, त्याबाबत जागरुकता पसरवणे हा यामागील उद्देश आहे.

काय आहे अनुभव?

डॉ. येल तुंग चेन लिहितात, कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या चार दिवसानंतर प्रचंड खोकला आणि अशक्तपण जाणवू लागला. परंतु आता छातीमध्ये वेदना होत नाहीये. त्यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, पहिल्या दिवशी गळ्यामध्ये खवखव आणि डोकेदुखी जाणवत होती, परंतु फुफ्फुसाचे काम व्यवस्थित सुरू होते. चौथ्या दिवशी गळ्यातील खवखव आणि डोकेदुखी थांबली, मात्र खोकला सुरुच होता. तसेच फुफ्फुसामध्येही तरल पदार्थ जमा झाल्याचे ते म्हणाले. याचे फोटोही डॉ. येल तुंग चेन यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

yale

दरम्यान, डॉ. येल तुंग चेन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृति वेगाने सुधरत आहे. ट्विटरवर माहिती देणे सुरू केल्यापासून जगभरातील नेटकऱ्यांकडून त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या