आधीच्या बायकोचे प्रेमसंबंध, नराधम बापाने मुलींसोबत केलं असं कृत्य

आधीच्या पत्नीला त्रास देण्यासाठी एका नराधम बापाने आपल्या दोन मुलींची निर्घृण हत्या करून समुद्रात फेकल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणातील एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलीचा शोध सुरु आहे. हत्या केल्यानंतर नराधम बाप बेपत्ता असून शोध सुरू आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार टॉमस गिमोनो असे त्या नराधम बापाचे नाव आहे. टॉमस 27 एप्रिलला आपली सहा वर्षांची मुलगी ऑलिव्हिया आणि एक वर्षाची ऍना यांच्यासह बेपत्ता झाला होता. तसेच त्याने बेपत्ता होण्याआधी आपली आधीची पत्नी बियेट्रिज झिमर्मनला ‘आपल्या मुलींना तुला पुन्हा पाहता येणार नाही’ असा शेवटचा मेसेज केला होता. त्याला आपली आधीची पत्नी एका श्रीमंत माणसाच्या प्रेमात असल्याने तो नाराज होता आणि तिला दु:ख द्यायचे होते.

मात्र टॉमसने असा मेसेज का केला असावा यासाठी बियेट्रिजने शोधाशोध केली. अखेर तिने त्याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांचा शोध घेतला मात्र तिघांचा कुठेच पत्ता लागला नाही. तरीही बियेट्रिजला आपल्या मुली सुरक्षित असल्याची आशा वाटत होती. मात्र गुरुवारी सहा वर्षाच्या ऑलिव्हियाचा समुद्रात तीन हजार फुट खोल पाण्यात मृतदेह सापडला आणि आईच्या काळजाचा ठोका चुकला. नराधम बापाने ऑलिव्हियाची हत्या करुन तिला स्पोर्ट्स बॅगेत भरून समुद्रात फेकले होते. मात्र अद्याप एका वर्षाच्या अन्नाचा शोध लागलेला नाहीय. मात्र तिचीही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात टॉमसने अपहरणानंतर लगेच 7.50 ते 9 दरम्यान घरातच मुलींची हत्या केली असावी. त्यानंतर मुलींचे मृतदेह वेगवेगळ्या बॅगेत भरले आणि समुद्रात फेकले. ज्या स्पोर्ट्स बॅगेत ऑलिव्हियाचा मृतदेह सापडला त्यात मृतदेह वर न येण्यासाठी अॅंकरही होता. त्यामुळे आरोपीने पू्र्णपणे प्रयत्न केला होता की मृतदेह न सापडण्याचा. त्यानंतर ज्या रात्री मुली गायब झाल्या होत्या त्या रात्री सांताक्रुझच्या मरीना टेनेराईफमध्ये टॉमस काही बॅगा लोड करत असल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तिथल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीनुसार त्याच्यासोबत मुली नव्हत्या. मात्र पोलिसांना आरोपीच्या बोटीतून असे पुरावे मिळाले की त्याने मुलींना मारुन बॅगेत त्यांचे मृतदेह घेऊन आला होता.

बियेट्रिजने टॉमस विरोधात खटला दाखल केला होता. शुक्रवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पॅनिश न्यायाधीश प्रिसिला एस्पिनोसा गुटेरेझ म्हणाले, “सध्याच्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी केवळ मुलींना त्यांच्या आईपासून दूर करू इच्छित नव्हता तर त्यांना त्याला जीवे मारायचे होते. आपल्या आधीच्या जोडीदाराला अमानुष वेदना देण्यासाठी, त्याने हा सुनियोजित कट घडवून आणला आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या