
एखादा गुन्हा केला किंवा समाजविघातक कृत्य केल्यास समाजात शांतता राहवी यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तुरुंगात डांबण्यात येते. अनेकजण तरुंगवासापासून वाचण्यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाही देतात. मात्र. एका 60 वर्षांच्या व्यक्तीने त्याला तुरुंगात टाकावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी त्याने चक्क तुरुंगाबाहेरच आपले बस्तान बसवले आहे. स्पेनच्या ग्रेनाडा येथील ही घटना आहे.
स्पेनच्या ग्रेनाडा येथील 60 वर्षांच्या जस्टो मार्केज़ यांनी आपल्याला तुरुंगात टाकावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मलागा में अल्हौरिन डे ला टोरे जेलबाहेरच आपले बस्तान बसवले आहे. आपल्याला एक दिवस तुरुंगात टाकतील, या अपेक्षेने गेल्या अनेक महिन्यांपासून ते कारागृहाबाहेर ठिय्या मांडून आहेत. त्यांच्या या विचित्र मागणीने प्रशासनही चक्रावले आहे. एका नागरिकाने जस्टो यांचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. जस्टो यांनी मला तुरुंगात टाका, अशी मागणीचे पोस्टर हातात घेत तुरुंगाबाहर उभए आहेत. तुरुंगात जाण्यासाठी आपण जेल वॉर्डन आणि जेलर यांची भेट घेतली. मात्र, स्वेच्छा कारागृहाची कोणतीही संकल्पना नसल्याने त्यांनी आपली मागणी मान्य करण्यास नकार दिल्याचे जस्टो यांनी सांगितले.
जस्टो यांना पाच मुले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून त्यांची आणि आपली भेट झालेली नाही. तसेच या वयात आपण चिंता, नैराश्य आणि हृदयविकाराच्या त्रासाने त्रस्त आहोत. आपल्याशी बोलायला किंवा आपल्यासोबत वेळ घालण्यासाठी कोणीही नाही. एकटेपणाला आपण कंटाळलो असून अनेक ठिकाणांहून मदत मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आलेले नाही. आपल्याला पैसा, प्रसिद्धी काहीही नको, फक्त माणसांचा सहवास हवा आहे. त्यासाठी जेल हेच योग्य ठिकाण असल्याचे आपल्याला वाटते. त्यामुळं आपल्याला तुरुंगात टाकण्याची मागणी आपण करत आहोत, असे जस्टो यांचे म्हणणे आहे.
आपल्याला मनोविकारतज्ज्ञांकडे पाठवण्यात आले. मात्र, आपण मनोरुग्ण नसून माझ्या एकटेपणावर त्यांच्याकडे कोणतीही उपाययोजना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही प्रसिद्धीसाठी किंवा वेडेपणाची ही मागणी नसून आपण एकटेपणापासून मुक्तता मिळवण्यासाठी ही मागणी करत असल्याचे जस्टो यांनी म्हटले आहे. आता प्रशासनालाच यावर मार्ग शोधून काढायचा आहे, जोपर्यंत मला तुरुंगात टाकणार नाही, तोपर्यंत मी इथेच ठिय्या मारुन बसणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.