१२० सिलिंडरचा स्फोट करण्याचा ‘त्यांचा’ कट होता!

35

सामना ऑनलाईन । बार्सिलोना

स्पेनमधील बार्सिलोना व कॅमब्रिल्स येथे व्हॅन हल्ला करुन १४ नागरिकांना चिरडणाऱ्या दहशतवाद्यांनी स्पेनमधील ऐतिहासिक चर्चबरोबरच अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोट घडवण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी एका घरात १२० सिलिंडर जमा केले होते.

या हल्ल्याचा तपास सुरू असून यात पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागली आहे. अल्कना शहरातील एका घरात हे दहशतवादी राहत होते. स्पेनमध्ये हल्ले घडवण्याची योजना सहा महिन्यांपूर्वीच दहशतवाद्यांनी आखली होती. त्यासाठी दहशतवाद्यांनी तीन गाड्या क्रेडिट कार्डवर घेतल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी व्हॅन हल्ला करण्याबरोबरच स्पेनमधील ऐतिहासिक चर्चमध्ये गॅस सिलिंडर व इतर स्फोटक भरलेली गाडी उडवण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. पण बुधवारी रात्री यातील एका सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे हा कट बारगळला व दहशतवाद्यांनी गुरुवारी बार्सिलोना व कॅमब्रिल्स येथे व्हॅन हल्ला केला.

ज्या घरात हे सिलिंडर ठेवण्यात आले होते त्या घरात १२ दहशतवादी राहत होते. या सगळ्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या योजनेस अंतिम रुप दिले होते. यातील पाच जणांना पोलिसांनी ठार केले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही तर एक जण फरार आहे

आपली प्रतिक्रिया द्या