धक्कादायक! प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये महिला सेलिब्रिटीवर झाला लैंगिक अत्याचार

4598

सध्या देशभरात बिग बॉसचा 13 वा सीझन चांगलाच गाजतो आहे. बिग बॉस हा रिअॅलिटी शो जसा आपल्या देशात प्रसिद्ध आहे तसाच तो जगभरात इतर देशांमध्येही प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील बिग ब्रदर या शोच्या धर्तीवर हा रिअॅलिटी शो वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावाने प्रदर्शित होतो.

carlota

या रिअॅलिटी शोमध्ये आता पर्यंत भांडण, मारामारी, आदळाआपट, शिवीगाळ हे सर्व झाल्याचे आपण ऐकले पाहिले असेल. पण स्पेनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या रिअॅलिटी शोमध्ये चक्क एका महिला सेलिब्रिटीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कारलोट प्राडो असे त्या महिलेचे नाव असून तिच्यावर जोस मारिया लोपेझ या सेलिब्रिटीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या रिअॅलिटी शोमध्ये जोस व कारलोट हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ते दोघे घरात असताना शोमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते दोघेही भरपूर दारू प्यायले होते. त्यानंतर कारलोट बेशुद्ध असताना जोसने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

जोस कारलोटवर लैंगिक अत्याचार करत असताना हा प्रकार कॅमेऱ्यांत रेकॉर्ड करण्यात आला होता. धक्कादायक बाब ही आहे की  या प्रकारानंतर निर्मात्यांनी कारलोटला सिक्रेट रुममध्ये नेऊन तिला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराचे रेकॉर्डींग दाखवले. रेकॉर्डिंग पाहात असताना तिच्या भावना टिपण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला होता. कारलोटला रेकॉर्डिंग दाखवताना निर्मात्यांनी शूट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत कारलोट तोंड लपवून रडत असल्याचे दिसतेय. तसेच तिने घरात परत जाऊन घरातल्या तिच्या मित्र मैत्रिणींना याबाबत सांगायचे असल्याचे निर्मात्यांना सांगितले. मात्र त्यांनी ती घरात परत जाऊ शकत नसल्याचे तिला सांगितले. निर्मात्यांनी कारलोटला याबाबत कुणाकडेही वाच्यता न करण्याची ताकीद दिली होती असे समजते. या प्रकारानंतर त्या कारलोट व जोस या दोघांनाही शो मधून काढण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या