Photo – अद्भूत! समुद्रतळाशी नाचणारा सर्वात सुंदर जीव कॅमेऱ्यात कैद

समुद्र आपल्या गर्भामध्ये असंख्य रहस्य घेऊन आहे. समुद्राच्या तळाशी आजही असे जीव आहेत ज्यांना मानवाने कधी पाहिलेलेही नाही. यातीलच एक सध्या जगासमोर आला असून याचे नाव स्पॅनिश डान्सर सी स्लग आहे. (Spanish Dancer Sea Slug)

समुद्रतळाशी राहणाऱ्या या जीवाला कॅमेऱ्यात कैद करण्यात यश आले आहे. लयबद्ध पद्धतीने पोहतानाचा त्याचे व्हिडीओही समोर आले आहे. यामुळेच त्याला स्पॅनिश डान्सर सी स्लग म्हटले जाते.

स्पॅनिश डान्सर सी स्लगचे शास्त्रीय नाव हेक्साब्रंचस सँजिनियस (Hexabranchus sanguineus) आहे. सामान्यत: 20 ते 30 सेंटीमिटर असणारा हा जीव 60 सेंटीमिटरपर्यंत वाढू शकतो. परंतु बालीमध्ये 90 सेंटीमिटरचा देखील स्पॅनिश डान्सर सी स्लग आढळल्याची नोंद आहे.

स्पॅनिश डान्सर सी स्लगचा रंग त्याचे मुख्य आकर्षण आहे. लाल, पिवळा, नारंगी रंगाच्या स्पॅनिश डान्सर सी स्लगला पाहताना आपण एखादे मोल्यवान रत्नच पाहतोय असा भास होतो. या जीवाचा काही भाग पारदर्शी असतो आणि शरिरावर ठिपके असतात.

स्पॅनिश डान्सर सी स्लग हिंद महासागर, अरबी समुद्र, प्रशांत महासागर, लाल समुद्र आणि आफ्रिका, जपान तसेच ऑस्ट्रलियाच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागातही आढलतो. दिवसा उजेडात हा जीव लपून राहतो आणि जसा-जसा अंधार पडतो, वातावरणात गारवा येतो तेव्हा हा जीव बाहेर सुक्ष्म समुद्री जीव खातो.