दुर्गामाता दर्शन; रत्नागिरी आणि राजापूरातील 10 मंदिरांच्या सफरीसाठी एसटीची खास बससेवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराने नवरात्रौत्सवात भाविकांसाठी खास भेट आणली आहे. रत्नागिरी आगाराच्या वतीने 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दर्शनासाठी बससेवा सुरु करण्यात येणार आहे. भाविकांना आता रत्नागिरी आणि राजापूरातील दुर्गामातेचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. एसटीमुळे आता एकाच दिवशी 10 ठिकाणी नवरात्रौत्सवात दुर्गामातेचे दर्शन घेता येणार आहे.

त्यामध्ये पावस येथील नवलाईदेवी, कशेळी येथील जाकादेवी, आडिवरे येथील महाकालीदेवी, वेत्ये येथील महालक्ष्मीदेवी, भालावली येथील आर्यादुर्गादेवी, रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवतीदेवी, जुगाईदेवी, शिरगाव येथील आदिष्टीदेवी, खेडशी येथील महालक्ष्मीदेवी, नाचणे येथील नाचणादेवीचे दर्शन घेता येणार आहे. याकरीता 305 रुपये प्रवासभाडे आकारले जाणार आहे. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक संदिप पाटील, मोबाईल 7588193774 स्थानकप्रमुख भाग्यश्री प्रभुणे, मोबाईल: 9850898327 या क्रमांकांवर संपर्क साधावा.