…तुम मेरी जिंदगी हो!

63

माझ्या बायकोचे माझ्या आयुष्याच सर्वोच्च स्थान आहे… सांगताहेत SEZ चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुलकर्णी ‘सहजीवनी’ या सदरात…

– लग्नाचा वाढदिवस – ४ फेब्रुवारी १९७७
– तिचे दोन शब्दात कौतुक – व्यवसायातील, जीवनातील उत्तम सहकारी
– आठवणीतला क्षण – आमच्या मुलाचा जन्म
– तिचा आवडता पदार्थ – आमरस
– स्वभावाचे वैशिष्टय़ – ती फार कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. एखादे काम हातात घेतले की त्याचा रिझल्ट मिळालायच हवा असा तिचा स्वभाव आहे.
– एखादा तिच्याच हातचा पदार्थ – सगळेच पदार्थ ती खूप छान बनवते. पण विशेष आवडतात ते तिच्या हातचे उकडीचे मोदक. ते ती अप्रतिम बनवते.
– वैतागते तेव्हा – गप्प राहतो.
– तिच्यातली कला – ती विणकाम फार उत्कृष्ट करते. घरातल्या प्रत्येकाचा स्वेटर तिनेच बनवलाय. एवढेच नाही तर आमचा असा एकही नातेवाईक नाही ज्याला तिने स्वेटर विणून दिलेला नाही.
– तिची गंमत करायची असल्यास – तशी मी कधी हिंमत केलेली नाही. करायचीच असेल तर मुलाला सामील करून करतो.
– तिच्यासाठी एखादी गाण्याची ओळ – ‘ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज़ ना होना की तुम मेरी जिंदगी हो… (‘संगम’)
– तुमच्या आयुष्यात तिचे स्थान – सर्वोच्च स्थान आहे.
– भूतकाळात जगायचे असेल तर…- मुलाचा जन्म
– आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट – मला माझ्या आयुष्यात जे काही तुझ्यासाठी करता येईल ते सगळे करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि अजूनही करतोय. ते तू गोड मानून घे आणि आयुष्यात अशीच तुझी साथ लाभू दे मला.
– ती नसताना – सोबत नसते तेव्हा मी स्वतःला कामात गुंतवून घेतो.

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं नवं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा आपल्या जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता –  आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या