7 एप्रिल रोजी ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फँड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदूक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यापूर्वीच या चित्रपटाचे टिझर आणि काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. टीझरने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली असून गाण्यांनाही लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांकडून मिळणारे हे प्रेम पाहता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, हे नक्की. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांच्याशी विशाल अहिरराव यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा.