अंधेरीत गर्डरच्या कामसाठी हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वे घेणार पॉवर ब्लॉक; वाहतुकीवर परिणाम

अंधेरी येथे गर्डर बसवण्याच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून हार्बर मार्गावर रविवार, सोमवार आणि मंगळवारी रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रविवार 29 जानेवारी, सोमवार, मंगळवार 30 आणि 31 तसेच 1 फेब्रुवारीला रात्री 10 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वांद्रे येथून गोरेगावकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच प्रवाशांनी याची दखल घेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.