भारीच! स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 12 हजार ते 6 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या खास ऑफर्स

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अनेक स्मार्टफोन कंपन्या खास ऑफर्स घेऊन आल्या असून तब्बल 12 हजार ते 6000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू असलेल्या ‘Mobile Bonanza’ सेल अंतर्गत या ऑफर्स देण्यात येत आहेत. चला तर अधिक जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर मिळतेय किती सूट…

Oppo Reno 5 Pro 5G –

oppo-reno-5-pro-5g

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने काही दिवसांपूर्वीच Oppo Reno 5 Pro 5G हा स्मार्टफोन हिंदुस्थानच्या बाजारात लॉन्च केला होता. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आलेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 35,990 रुपये होती, मात्र आता यावर 3500 रुपयांची सूट मिळत आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआयचे कार्ड असेल तर तुम्हाला ही सूट मिळणार आहे. तसेच हा फोन No Cost EMI वरही तुम्ही खरेदी करू शकता. यासह 16,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज (जूना मोबाईल देऊन नवा मोबाईल घेणे) ऑफरही मिळत आहे.

या फोनमध्ये 6.55 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून 4350एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमिरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल, 2+2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G 5G –

moto-g-5g

या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनवर 6 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. यामुळे फोनची किंमत 24,999 रुपयांवरून 18,999 रुपयांवर आली आहे. आयसीआयसीआयचे कार्ड वापरून तुम्ही हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंटही तुम्हाला मिळू शकतो. अॅक्सिंस बँकेच्या कार्डवर 5 टक्के डिस्काउंट किंवा अनलिमिटेड कॅशबॅक ही ऑफरही सुरु आहे. हा फोन तुम्ही No cost EMI वरही खरेदी करू शकता, तसेच 16500 रुपयांची एक्सचेंज ऑफरही कंपनी देत आहे.

iQOO 3 (5G)

iqoo-3-5g

या फोनमध्ये कंपनीने 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज दिले आहे. फोनची किंमत 46,990 रुपये आहे. या फोनवर 12 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत असून यामुळे फोनची किंमत 34,990 रुपये झाली आहे. आयसीआयसीआयच्या बँक कार्डच्या मदतीने तुम्ही हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंटही मिळू शकतो. तर अॅक्सिंस बँकेच्या कार्डवर 5 टक्के डिस्काउंट किंवा अनलिमिटेड कॅशबॅक ही ऑफरही सुरु आहे. हा फोन तुम्ही No cost EMI वरही खरेदी करू शकता, तसेच 16500 रुपयांची एक्सचेंज ऑफरही कंपनी देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या