कोरोनापासून सुरक्षेसाठी डहाणू पोलिसांनी उभारला पहिला सॅनिटायझर कक्ष

644

>>योगेश चांदेकर

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी डहाणू पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात सुरक्षेसाठी एक सॅनिटायजर कक्षच उभारण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कामगारांच्या मदतीने या निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येणारे अभ्यागत, तक्रारदार आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी हा सॅनिटायजर कक्ष उभारण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात असा पहिलाच निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी दिली आहे.

निर्जंतुकीकरण कक्षाच्या दोन्ही बाजूला सॅनिटायझरचा फवारा सुरु होण्यासाठी बटन आहेत. बटन दाबताच सॅनिटायझरचा फवारा होऊन निर्जंतुकीकरण होते. कामानिमित्त पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याप्रमाणे तलासरी, घोलवड पोलीस ठाण्यातही असे निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी दिली आहे. पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार आणि पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कक्ष महत्त्वाचा असल्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या