होळीसाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल ट्रेन

16
प्रातिनिधिक रेल्वे

सामना ऑनलाईन,मुंबई

मध्य रेल्वेच्या सहाय्याने कोकण रेल्वे चार होळी स्पेशल ट्रेन चालविणार आहे. सीएसटी ते करमाळी आणि सीएसटी ते मडगावदरम्यान या स्पेशल ट्रेन धावणार आहेत.

ट्रेन क्र. ०१०३३ सीएसटी-करमाळी स्पेशल ट्रेन १० मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता सीएसटीहून सुटणार असून करमाळीला दुसऱया दिवशी सकाळी ११ वाजता पोहचणार आहे.

ट्रेन क्र. ०१०३४– परतीच्या प्रवासासाठी करमाळी-सीएसटी स्पेशल ट्रेन ११ मार्च रोजी करमाळीहून दुपारी १.३५ वाजता सुटणार असून सीएसटीला रात्री १२.१० वाजता पोहचणार आहे.

ट्रेन क्र. ०१०८९ सीएसटी-मडगाव स्पेशल ट्रेन १२ मार्च रोजी रात्री ११.५५वा. सीएसटीहून सुटणार असून मडगावला दुसऱया दिवशी दुपारी १२ वाजता पोहचणार आहे.

ट्रेन क्र. ०१०९० –परतीच्या प्रवासासाठी मडगाव-सीएसटी स्पेशल ट्रेन १३ मार्च रोजी संध्याकाळी ७. ४०वा. मडगावहून सुटणार असून सीएसटीला दुसऱया दिवशी सकाळी ८. १५ वा. पोहचणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या