मोठी बातमी – शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी ST च्या ‘महिला विशेष’ फेऱ्या, अनिल परब यांची माहिती

कोविड-19 च्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याकाळात महिलावर्गाला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

तसेच सुरुवातीला डोंबिवली, पनवेल, विरार येथून मंत्रालयाकरीता प्रत्येकी एक बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. महिला प्रवाशांचा प्रतिसाद बघून फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एसटीची प्रवासी वाहतुक 50 टक्के क्षमतेने चालविण्यात येत होती. मात्र उद्यापासून लालपरी पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व बसेस वारंवार सॅनिटाईझ करण्यात येणार आहेत.प्रवाशांनी देखील मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे, अशी माहिती याआधी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या