व्हेंटिलेटरवर असलेल्या नवऱ्याचे शुक्राणू पत्नीला देण्याचे न्यायलयाचे हॉस्पिटलला आदेश

गुजरातमध्ये एका तरुणाला कोरोना झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो व्हेटिंलेटरवर आहे. त्याचे वाचण्याचे चान्सेस कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर महिलेने पतीच्या शुक्राणूंसाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने देखील महिलेची भावनिक बाजू समजून घेत तिच्या पतीचे शुक्राणू तिला द्यावेत असे आदेश रुग्णालयाला दिले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या सुशीलला (नाव बदलले आहे) कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत खालावली होती. व्हेंटिलेटरवर त्याला ठेवण्यात आले होते. त्याचे जगण्याचे चान्सेस कमी असल्याचे डॉक्टरांनी त्याची पत्नी रिनाला (नाव बदलले आहे) सांगितले तेव्हा तिला धक्काच बसला. मात्र पतीची एक निशाणी आपल्यासोबत कायम रहावी म्हणून रिनाने आयव्हीएफ पद्घतीने आई होण्याचे ठरवले. त्यासाठी तिने रुग्णालयाला पतीचे शुक्राणू (Sperm) देण्यास सांगितले. मात्र रुग्णालयाने सुशीलच्या परवानगी शिवाय शुक्राणू देता येणार नसल्याचे सांगितले. मात्र सुशील बेशुद्ध होता त्यामुळे तो त्याच्या परवानगीच्या पत्रावर सही करू शकत नव्हता.

अखेर रीनाने सुशीलाच्या शुक्राणूंसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. गुजरात उच्च न्यायालयात तिने याचिका दाखल केली. तिच्या या याचिकेवर न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय दिला आहे. रुग्णालयाने महिलेला तिच्या पतीचे शुक्राणू देण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या