हे राजकारणच! एसपीजी हटवण्यावरून प्रियंकांचा केंद्रावर निशाणा

200

 गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. हा राजकारणाचाच भाग आहे व हे होतच राहते, अशी प्रतिक्रिया त्यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांनी देशातील मंदीबाबतही भाष्य केले.

देशाची अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत आहे. मंदीचे संकट सरले पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने काहीतरी केलेच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर प्रियंका यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या झाल्यानंतर गांधी परिवाराला एसपीजी सुरक्षाकवच पुरविण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या