देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाखाच्या पार

453

देशात गेल्या 24 तासात 65 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले असून 996 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून ही बाब अत्यंत चिंतेची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात सध्या 25,26,193 कोरोनाग्रस्त असून त्यातील 6,68,220 कोरोनाग्रस्त हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 18,08, 937 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील मृतांचा आकडा देखील 49,036 वर पोहोचला आहे.

जगभरात सध्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात अमेरिका पहिल्या स्थानावर असून त्याखालोखाल ब्राझिल दुसऱ्या व हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,13,55,685 वर पोहोचला असून सात लाख 63 हजार 367 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण आकड्यापैकी 1,41,49,309 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अमेरिकेत 54,76,266 कोरोनाचे रुग्ण असून ब्राझिलमध्ये 32,78,895 रुग्ण आहेत

आपली प्रतिक्रिया द्या