…आणि पानमसाला खायची सवय तरुणाच्या जीवावर बेतली

39
file photo

सामना ऑनलाईन । लखनौ

गुटखा, तंबाखू, पान मसाला हे आरोग्याला हानिकारक आहेत, असं कितीतरी वेळा सांगण्यात येतं. मात्र, अनेकजण हे व्यसन सोडत नाहीत. अशा प्रकारची व्यसनं करून ते स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. पण, लखनौमध्ये मात्र एका माणसाच्या पानमसाला खाण्याच्या सवयीने दुसऱ्याचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयुष शर्मा (26) असं या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. भाज्यांचा व्यवसाय करणारा आयुष शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमाराल लखनौहून आशियाना या भागात बाईकवरून चालला होता. वाटेत एका चौकात समोरून येणाऱ्या एका कॅबचालकाने कॅबचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे आयुष कॅबला जाऊन धडकला. हेल्मेट न घातल्यामुळे या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेतील कॅबचालक नफीस हा पानमसाला खाऊन गाडी चालवत होता. तो थुंकण्यासाठीच त्याने गाडीचा दरवाजा उघडला होता. या अपघातात तोही किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर उपचार करून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने आपण थुंकण्यासाठीच गाडीचा दरवाजा उघडल्याचं कबूल केलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या