दापोली विधानसभा मतदारसंघात जनतेने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जबरदस्त पाठिंबा दिला आहे. तसेच गद्दारांनी शिवसेनेच्या नावावर ऐश्वर्य मिळविले, पद, मान मराबत मिळाले त्याच शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खूप काही देऊनही शिवसेनेशी गद्दारी केली. तसेच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडून राज्यात ज्याप्रकारे बेकायदा सरकार स्थापन केले, ते जनतेला पटलेले नाही. हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील गद्दारीला शिवसेनेची धगधगती मशाल जाळून टाकेल आणि पुन्हा दापोली मतदार संघावर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी ठाणे दिवा येथील मेळाव्यात व्यक्त केला.
साऊथ इंडियन स्कूल सुरेश नगर दिवा (पुर्व) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दापोली विधानसभा मुंबईवासीय (दापोली, मंडणगड, खेड) निष्ठावंत शिवसैनिकांचा भव्य मेळावा उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे दिवा येथे झाला. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम यांचा शिवसेना युवासेना दापोली तालुक्याच्या वतीने दापोली तालुका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना जिल्हा प्रमुख संजय कदम यांची तोफ चांगलीच धडाडली. आपल्या अभ्यासपूर्ण वर्कृत्वाने शिवसेना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
या कार्यक्रमाला विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड,सहसंपर्क प्रमुख अजित शिर्के, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे मंडणगड संपर्क प्रमुख महेश गणवे सहसंपर्क प्रमुख रघुनाथ धनावडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, खेड ता.मुंबई संघटक शंकर डांगे, समाजसेवक दशरथ पाटील , दापोली ता. सहसचिव राजेश इंदुलकर दिलीप पावसकर, डॉ.रमेश चव्हाण, युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार, कोळबांद्रे विभाग युवासेनेचे गणेश दवंडे, खेर्डी विभाग अधिकारी सुधीर पवार स्वप्निल पाटील, सुहास कान्हाल तसेच सर्व आजी माजी पदाधिका-यांसह शिवसैनिक युवासैनिक मोठ्याा संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दापोली तालूका सहसचिव विजय भुवड यांनी केले.