तब्बल शंभर वर्षांनंतर फ्रान्समध्ये होणार ऑलिम्पिक

13

सामना ऑनलाईन । मुंबई

२०२४ आणि २०२८ मधील ऑलिम्पिक खेळांसंर्भाबाबत घोषणा करण्यात आली आहे. २०२४ व २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचा बहुमान अनुक्रमे फ्रान्स आणि अमेरिकेतील लॉस अॅन्जेलिस शहराला मिळाला आहे.

खरं तर दोन्ही शहरांना २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करायचे होते, परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) निधी मिळण्याची हमी मिळाल्यानंतर लॉस अॅन्जेलिसने माघार घेत चार वर्षांपर्यंत प्रतीक्षा करण्याची तयारी दर्शवली. याबाबत विचारले असता लॉस अॅन्जेलिसने सांगितले की, त्यांना मिळालेल्या या अतिरिक्त वेळामुळे त्यांना खेळांच्या आयोजनाच्या तयारीसाठी वेळ मिळेल. तर फ्रान्सने सांगितले की, २०२४ नंतर पुनर्विकासामुळे त्यांना क्रीडा स्पर्धा खेळवता येणार नाहीत.

२००८ आणि २०१२ मध्ये, इतर देशांसोबत फ्रान्स देखील ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या शर्यतीत होता, त्यापूर्वी शंभर वर्षांपूर्वी फ्रान्सला ऑलिम्पिकच्या आयोजनाचा बहुमान मिळाला होता. आता तब्बल शंभर वर्षांनंतर फ्रांसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. लॉस अॅन्जेलिसमध्ये यापूर्वी १९३२ आणि १९८४ असे दोन वेळा ऑलिम्पिक झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या