एक बाटली बिअरसाठी पत्रकाराला मोजावे लागले 71 लाख रुपये

914

काही दिवसांपूर्वी साध्या गोष्टींसाठी हॉटेलवाल्यांनी ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केल्याच्या घटना समोर आल्या. यावरून सोशल मीडियावर संबंधित हॉटेलवर टीकेची झोडही उठली. यात बॉलीवूड अभिनेता राहुल बॉस याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी 442 रुपये घेतल्याचे सोशल मीडियावर सांगितले. तर ‘ऑल द क्वीन्स मेन’चे लेखक कार्तिक धर यांना दोन उकडलेल्या अंड्यासाठी 1700 रुपये मोजावे लागले होते. पण ऑस्ट्रेलियाचा क्रीडा पत्रकार असलेल्या पीटर लालोरला मॅनचेस्टर येथे एका बीअरच्या बाटलीसाठी एक दोन नाही तर चक्क 71 लाख रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागल्याचे समोर आले आहे.

पीटर मालमॅशन हॉटेलमध्ये त्याच्या काही खास मित्रांसोबत गेला होता. येथे त्याने 1 बीअरची बाटली मागवली. खाण्यापिण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पीटर यांनी बील देण्यासाठी डेबिट कार्ड स्वाईप केले. त्यावेळी त्याच्या खात्यातून 99,983.64 डॉलर म्हणजे 71 लाख 65 हजार 31 रुपये कमी झाले. सुरुवातीला चष्मा न घातल्यामुळे पीटरला आपल्या खात्यातून किती पैसे कमी झाले ते नीट कळाले नाही. मात्र हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने त्याला सांगितले. त्यानंतर पीटरने हॉटेल मॅनेजरला संपर्क केला. त्यावर मॅनेजरने बिअरची असेल ते पैसे कमी करून उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन पीटरला दिले. तेव्हा कुठे पीटरच्या जीवात जीव आला.

आपल्यावरील हा प्रसंग पीटरने सोशल मीडियावर शेअर केला. ही ऐतिहासिक बिअर आहे. मॅन्चेस्टरच्या मालमॅशन हॉटेलमध्ये यासाठी 99,983.64 डॉलर भरावे लागले, असे यात पीटरने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या