राष्ट्रकुल स्पर्धेत अवतरले बाळकृष्ण

नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 61 हिंदुस्थानी खेळाडूंनी पदके जिंकली. प्रतिष्ठsच्या स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर अनेक खेळाडूंच्या संघर्षाच्या गोष्टी समोर आल्या. या सर्व खेळाडूंमध्ये एक खेळाडू अशी होती जिने सातासमुद्रापार लंडनमध्ये जगाला हिंदुस्थानी संस्कृतीची झलक दाखवली. चालण्याच्या शर्यतीमध्ये (रेस वॉक) रौप्यपदक पटकावणाऱया प्रियंका गोस्वामीने पदक वितरण सोहळ्यात आपल्यासोबत ‘बाळकृष्णा’ची मूर्ती घेऊन प्रवेश केला होता. पदक वितरण सोहळय़ातील तिचे बाळकृष्णा’च्या मूर्तीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे तीने मूर्तीला हिंदुस्थानी राष्ट्रध्वजातील तीन रंगांची वस्त्रs घातली होती. आपल्याला मिळालेले पदक तिने भगवान श्रीकृष्ण आणि कुटुंबाला समर्पित केले. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळू शकले नसते, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.