NZ vs IND -न्यूझीलंडचा 22 धावांनी विजय

1151

न्यूझीलंड आणि हिंदुस्थान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 22 धावांनी विजय झाला आहे. या सामन्यातील महत्त्वाचे मुद्दे –

 • हिंदुस्थान विरुद्धच्या लढतीत न्यूझीलंडचा 22 धावांनी विजय
 • 36 चेंडुंत 45 धावांची गरज
 • नवव्या विकेटसाठी युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाची भागीदारी
 • हिंदुस्थानला आठवा धक्का, नवदीप सैनी बाद
 • हिंदुस्थानला 46 चेंडुंत 68 धावांची गरज
 • आठव्या विकेटसाठी जडेजा आणि नवदीप सैनीत भागीदारी
 • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
 • हिंदुस्थानच्या 7 बाद 182 धावा
 • हिंदुस्थानच्या सात बाद 157 धावा
 • हिंदुस्थानला सातवा धक्का, शार्दुल ठाकूर यष्टिचीत
 • सहा बाद 132 धावा
 • टीम इंडियाची सहावी विकेट, श्रेयस अय्यर झेलबाद
 • हिंदुस्थानी संघाची स्थिती सावरली. पाच बाद 125 धावा
 • हिंदुस्थानी संघाची 5 बाद 96 अशी दयनीय स्थिती
 • हिंदुस्थानी संघाला विजयासाठी 274 धावा हव्या असून 14 षटकांत फक्त 71 धावा झाल्या आहेत.
 • हिंदुस्थानी संघाला चौथा धक्का, के.एल.राहुल तंबूत परतला
 • हिंदुस्थानचा संघ पराभवाच्या छायेत, संघाच्या 3 बाद 59 धावा
 • पृथ्वी शॉ 24 धावांवर तर मयंक अग्रवाल 3 धावांवर बाद
 • हिंदुस्थानी संघाचे दोन गडी बाद
 • हिंदुस्थानी संघाची खराब सुरुवात

न्यूझीलंड आणि हिंदुस्थानमध्ये खेळवण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेमधील दुसरा एकदिवसीय सामना ऑकलंड येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाहुण्या संघासमोर विजयासाठी 274 धावांचे आव्हान ठेवले आहे. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी थोडीशी सावध सुरुवात केली. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांनी जम बसल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. 17 व्या षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. फिरकीपटू यजुवेंद्र चहलने निकोल्सला चकवलं आणि पायचीत केलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलच्या साथीने गप्टीलने धावसंख्या वेगात वाढवायला सुरुवात केली.

new-image-of-ross-taylor

ब्लंडल 22 धावांवर असताना त्याला शार्दूल ठाकूरने बाद केला. त्यानंतर आलेल्या रॉस टेलरच्या मदतीने गप्टीलने वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला मात्र तो 79 धावांवर असताना बाद झाला. तो बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ही 171 होती. रॉस टेलरने अर्धशतक झळकावत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या टोकाचे फलंदाज झटपट बाद होत गेले.

ravindra-jadeja

टेलरने दुसऱ्या बाजूला पडझड सुरू असताना खेळपट्टीवर ठाण मांडून बसण्याचं ठरवलं होतं. त्याने शेवटच्या षटकांमध्ये कायल जेमीसनच्या साथीने तुफान फटकेबाजी करत न्यूझीलंडला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडचा संघ 273 धावांपर्यंत पोहचू शकला.

हिंदुस्थानतर्फे यजुवेंद्र चहलने सर्वाधिक म्हणजे 3 बळी टीपले.शार्दूल ठाकूरने 2 तर रवींद्र जाडेजाने एक बळी टीपला. हिंदुस्थानी संघाने शनिवारच्या सामन्यासाठी दोन बदल केले. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांच्या जागी  नवदीप सैनी आणि यजुवेंद्र चहल यांची संघात निवड केली आहे.

 • यजुवेंद्र चहलने तिसरा बळी टीपला, टीम साऊदीला केले बाद
 • न्यूझीलंडचे 4 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले
 • रवींद्र जाडेजाने एका गड्याला बाद केले
 • शार्दूल ठाकूर आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 बळी टीपले
 • न्यूझीलंडचे 7 गडी बाद, 38 षटकांत187 धावा
 • न्यूझीलंडच्या 35 षटकांत 5  बाद 176 धावा
 • न्यूझीलंडच्या 33 षटकांत 4  बाद 171 धावा
 • मार्टीन गप्टील 79 धावांवर बाद
 • न्यूझीलंडला दुसरा धक्का, टॉम ब्लंडलला शार्दूल ठाकूरने बाद केले
 • न्यूझीलंडला पहिला धक्का, हेन्री निकोल्सला चहलने बाद केले
 • गप्टीलने आतापर्यंत 38 चेंडूत 45 धावा फटकावल्या आहेत
 • न्यूझीलंडच्या 15 षटकांत बिनबाद 83 धावा
 • मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली
 • न्यूझीलंडच्या 7 षटकांत बिनबाद 28 धावा
 • हा सामना ऑकलंडमधील इडन पार्क इथे खेळवण्यात येत आहे.
 • हिंदुस्थानी संघ पुढील प्रमाणे आहे-  पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

———————————————————————————————

 • न्यूझीलंडचा संघ पुढील प्रमाणे आहे- मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, टॉम लॅथम (कर्णधार / विकेटकीपर), जेम्स निशाम, कॉलिन डी ग्रैंडहोम, टीम साऊदी, मार्क चॅपमन, कायल जॅमिसन, हामिश बेनेट

———————————————————————————————-

 • एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता
 • कुलदीप यादवच्या जागी यजुवेंद्र चहलचा संघात समावेश
 • मोहम्मद शमीच्या जागी नवदीप सैनीची निवड
 • हिंदुस्थानी संघात दोन बदल
 • पहिले गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
 • हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकली
 • न्यूझीलंड आणि हिंदुस्थान दुसरा एकदिवसीय सामना
आपली प्रतिक्रिया द्या