हॉकीपटू सलीमाला मॅच जिंकल्यावर मिळायचे कोंबडय़ा, बकऱ्यांचे बक्षीस

राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकून 16 वर्षांचा दुष्काळ संपवणाऱया हिंदुस्थानी महिला हॉकी संघात सलीमा टेटेसारखी खेळाडू आहे, जिने अवघ्या सहा वर्षांत आपल्या असामान्य खेळाने अनेक यश संपादन केले आहे. झारखंडच्या छोटय़ाशा गावात हॉकीचे धडे घेणाऱया सलीमाची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. त्यामुळे तिला बांबूची हॉकी स्टिक बनवून वडिलांनी हॉकीत तरबेज केले. सलीमाचे वडीलही स्वतः स्थानिक हॉकीपटू होते. सलीमाच्या गावचा संघ हॉकीत जिंकला की त्यांना बक्षीस म्हणून काही काsंबडय़ा अथवा जिवंत बकरा मिळायचा. केवळ बक्षिसासाठी खेळायचे एवढाच त्यांचा आनंद होता. पण मोठय़ा परिश्रमाने सलीमाने हॉकीत गोल डागण्यात प्रावीण्य मिळवत देशाला राष्ट्रकुलसारख्या मोठय़ा स्पर्धेत कास्यपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाट उचलला आहे.