‘दालमिया’ कॉलेजमध्ये खेल महोत्सव

165

मालाडच्या प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजमध्ये यावर्षी ‘खेल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालये सहभागी होणार असल्यामुळे विविध स्पोर्टस् कॉम्पिटिशनचे घमासान अनुभवायला मिळणार आहे. हा खेल महोत्सव १३ आणि १४ डिसेंबर रोजी मालाड पश्चिम सुंदर नगर येथे कॉलेज परिसरात होणार आहे. या खेल महोत्सवात कॅरम, रिंक फुटबॉल, टेबल टेनिस आणि व्हॉलीबॉल अश स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन उदय पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज कर्णधार परिषदेचे महामंत्री लायन कन्हैयालाल सराफ, प्राचार्य डॉ. एन. एन. पांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या