
शालेय स्तरावरूनच देशपातळीवर नव्या पिढीतील खेळाडू घडवण्याचा संकल्प स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) कंपनीने केला आहे. मुलांमधील गुण ओळखून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी योग्य प्रशिक्षक आणि प्रशिक्षण मिळवून देण्याचे काम ही कंपनी करणार आहे. कंपनीकडून येत्या चार महिन्यांत 10 चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले असून त्या माध्यमातून दोन लाख विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात क्रिकेट वगळून 30 पेक्षा जास्त खेळांचा समावेश आहे. या आधी आयोजित केलेल्या चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत चार हजार शाळांनी सहभाग घेतला आहे. देशपातळीवर तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृती नेण्याचा आमचा हेतू आहे, अशी माहिती एसएफए कंपनीचे संस्थापक ऋषिकेश जोशी आणि विश्वास चोक्सी यांनी दिली.