सुवर्णपदक जिंकल्यावर लक्ष्यने रॅकेट भिरकावून केले सेलेब्रेशन

हिंदुस्थानला पुरुष एकेरीत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून देणाऱया लक्ष्य सेनने फायनलमधील विजयानंतर सुवर्ण जिंकल्याच्या आनंदात आपली विजयी रॅकेट आणि जर्सी प्रेक्षकांना बहाल करण्यासाठी फेकली. लक्ष्यच्या या आगळय़ा सेलेब्रेशनचा व्हिडीओ जगभरात तुफान लोकप्रिय ठरला आहे. 20 वर्षीय लक्ष्यने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिल्या सेट गमावल्यानंतरही दुसऱया आणि तिसऱया सेटमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठी जोरदार पुनरागमन केले.