शाबास, सिंधू आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केलीस! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू वॉर्नरकडून स्तुतिसुमने

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी हिंदुस्थानी बॅटमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली. महिला बॅटमिंटन तारका पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. जगभरातील चाहत्यांनी तिच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. परदेशातही ‘बॅडमिंटन क्वीन’ सिंधूचे चाहते आहेत. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही यात समावेश होतो. “शाबास, पी. व्ही. सिंधू, आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केली,’’ असे कॅप्शन वॉर्नरने सिंधूच्या फोटोला दिले आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी कँडीसने प्रतिक्रिया दिली आहे. कँडीसने “खूप छान,’’ अशी कमेंट केली आहे.

युवासेना कॉलेज कक्ष दक्षिण मुंबईचे सक्रिय सदस्य व वरळी-कोळीवाडा येथील युवासैनिक दीपेश जांभळे याने अजरबैजान येथे पार पडलेल्या मिल्ली यावलीक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत बेल्ट रेसलिंग फ्री स्टाइलमध्ये सुवर्णपदक आणि बेल्ट रेसलिंग क्लासिक स्टाइलमध्ये कास्य पदक पटकावले. या नेत्रदीपक यशानंतर त्याने ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार व शिर्डी संपर्कप्रमुख सुनील शिंदे, युवासेना सचिव व युवासेना कॉलेज कक्षप्रमुख वरुण सरदेसाई हेही उपस्थित होते.