आशिया चषकासाठी निवड न झाल्याने ईशान किशन नाराज

आशिया चषकासाठी के. एल. राहुलला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे. राहुल संघात येताच सलामीवीर ईशान किशनला संघातून वगळण्यात आले आहे. असे होताच, इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला फोटो शेअर करत ईशान किशनने गाण्याच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘अब ऐसा बनना नहीं भले घायल हो जाना, तुझे मूर्ख समझे कोई, तो तू फायर हो जाना, इन सब आगे वालों की तरह ना गायब हो जाना,’ असे बोल असलेले गाणे त्याने फोटोसोबत वापरले आहे. आशिया चषकासाठी संघ निवड झाल्यानंतर ईशानने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या भावुक स्टोरीची सर्वत्र चर्चा आहे.