२०१७ – क्रीडाविश्वातून निवृत्त झालेले खेळाडू

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाच्या वर्षी क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले. या दिग्गजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. चला तर पाहुया २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंची नावे…

आशिष नेहरा –

ashish-nehra-3

टीम इंडियाचा गोलंदाज आशिष नेहराने १९९९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नेहराने १७ कसोटी, १२० वन-डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले. नवा चेंडू हाताळणे हे वैशिष्ट्य असलेला नेहरा १ नोव्हेंबरला निवृत्त झाला.

उसेन बोल्ट –

usain-bolt

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने वयाच्या १५ व्या वर्षी २००२ मध्ये वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बोल्टला ‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ म्हणून ओळखले जाते. ऑलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टने ऑगस्ट महिन्यात निवृत्तीची घोषणा केली.

काका –

kaka-1

ब्राझीलचा फुटबॉलपटू काका याने १९९४ ला साओ पाऊलो या क्लबकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. रिकाडरे इझेस्कोन डॉस सँतोस लेइट या मूळ नावापेक्षा तो ‘काका’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. २००२, २००५, २००९ असे तीन विश्वचषक खेळणारा तसेच ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार जिंकणाऱ्या काकाने यंदा फुटबॉलविश्वातून निवृत्ती घेतली.

मार्टिना हिंगिस –

martina-hingis
१९९०च्या दशकात सुपरस्टार म्हणून नावारूपाला आलेली स्विस टेनिसपटू मार्टिना हिंगिसने सिंगस्लमध्ये पाच वेळा ग्रँड स्लॅम टायटल जिंकले आहे. या आधी तिने दोनदा निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र मार्टिना हिंगिस ही अखेर २८ ऑक्टोंबरला निवृत्त झाली.

फ्रान्चेस्को टोट्टी  –

francesco-totti

इटलीचा फुटबॉलपटू फ्रान्चेस्को टोट्टी याने ए.एस.रोमा या नावाजलेल्या इटालियन क्लबमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली. टोट्टीने २००२ व २००६चा फुटबॉल विश्वचषक खेळला असून २८ मे रोजी त्याने निवृत्तीची घोषणा केली.

मोहम्मद फराह –

mohamed-farah

चार वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ब्रिटिश धावपटू मोहम्मद फराह दोन वेळा १०००० मीटर आणि ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. लंडनमध्ये झालेल्या जागतिक अॅथलिटीक्स चॅम्पियनशिपमध्ये १०००० मीटरमध्ये शेवटच्या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक जिंकले होते.