जळगावमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, २ ठार

9

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगावमधील शिरसोलीजवळ प्रकाश शामलाल मिलवाणी यांच्या मालकीच्या शामा फायर फटाक्याच्या कारखान्यात उन्हामुळे फटाक्याची दारू साठवलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा दोन कामगार त्या ठिकाणी काम करत होते. स्फोटामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा स्फोट झाला.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे हा स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. या स्फोटामध्ये चेन्नई येथील हेमंत जयस्वाल (४५) आणि शिरसोली येथील राजेंद्र तायडे (३६) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या