स्पृहा आणि गश्मीर म्हणताहेत ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’

सामना ऑनलाईन । मुंबई

नवा गडी-नवं राज्य, छापा काटा, डबलसीट, टाईम प्लीज यांसारख्या अनेक नाटक आणि चित्रपटांचे लेखक- दिग्दर्शक समीर विद्वांस आता प्रेक्षकांसमोर एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. मला काहीच प्रॉब्लेम नाही अशा नावाच्या या चित्रपटात स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी ही हटके जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

mala-kahich-problem-nahi1

या चित्रपटाची निर्मिती पी. एस. छतवाल आणि रीचा सिन्हा यांनी केली असून सहनिर्माते रवी सिंह आहेत. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, ह्रषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचं संगीत असणार आहे तर छायाचित्रदिग्दर्शन प्रसाद भेंडे यांचं आहे. फिल्मी किडा प्रॉडक्शन्स निर्मित मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या