सोशल मीडियावरून तरुणीला त्रास देणाऱ्याला अटक

31
सामना ऑनलाईन । ठाणे
प्रेमाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या मुलीला धडा शिकवण्यासाठी इंस्टाग्रामवर नकली प्रोफाईल बनवून त्रास देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर सायबर गुन्ह्याखाली दर्श सत्रा (२१) याला नौपाडा पोलिसांनी अटक केलं आहे. पीडित तरुणी नौपाडा येथे राहत असून ती विले पार्ले येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
विले पार्ले येथील कॉलेजमध्ये आरोपीने पीडित मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासमोर प्रेमाच प्रस्ताव ठेवला. मात्र मुलीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र तो तिला त्यानंतर सतत इंस्टाग्रावर मेसेज करू लागला. त्यानंतर तिने त्याला इंस्टाग्रावरही ब्लॉक केले. त्यानंतर आरोपीने तिला धडा शिकविण्यासाठी तिची जवळपास १५ बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आणि तेथे तिचे फोटो अपलोड करू लागला. तसेच तिला मेसेज करून धमक्याही देत असे. तसेच  तिचे फोटो इतरांना पाठवून तिची फसवणूक आणि बदनामी करण्यास सुरुवात केली.
अखेर कंटाळून पीडित मुलीने सहा महिन्यापूर्वी याबाबत ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रकरणाचा सावधपणे तपास करत इंस्टाग्राम अकाउंट तयार केलेल्या आयपी अॅड्रेसचा आधार  घेत पोलिसांनी आरोपीला अटक बुधवारी अटक केली. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत असून ठाणे कोर्टानं आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या