T20 WORLD CUP – श्रीलंका सुपर-12 फेरी गाठणारा पहिला संघ; हंसरंगाची चमकदार अष्टपैलू खेळी

वनिंदू हसरंगाची  (71 धावा आणि 1 बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (17 धावांत 3 विकेट) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेण्टी-20 विश्वचषकात आयर्लंडला 70 धावांनी पराभूत  केले. सलग दुसऱया विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-12’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला.

श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 18.3 षटकांत 101 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार अॅण्डी बलबिरीनने (41) एकाकी झुंज दिली. आता आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतीचा विजेता या गटातून श्रीलंकेसह पुढील फेरीत आगेपूच करेल. तत्पूर्वी, डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटिलच्या (23 धावांत 4 विकेट) प्रभावी माऱयामुळे श्रीलंकेची दुसऱयाच षटकात 3 बाद 8 धावा अशी अवस्था झाली. मात्र हसरंगा आणि पथुम निस्सांका यांनी चौथ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. अखेरच्या षटकांत कर्णधार दसून शनाकाने (11 चेंडूंत नाबाद 21) फटकेबाजी केल्यामुळे श्रीलंकेने 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली.