हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक मैदानातच भिडले, व्हिडीओ व्हायरल

मंगळवारी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान श्रीलंका संघाचा 3 विकेट्सने पराभव केला. दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने श्रीलंकेच्या विजयाचा घास तोंडातून हिसकावून घेतला. हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात भर मैदानात वाद झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 275 धावा केल्या आणि टीम इंडियासमोर विजयासाठी 276 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाची पहिली आणि मधली फळी कापून काढली. टीम इंडियाची अवस्था 7 बाद 193 अशी असताना दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी नाबाद 84 धावांची भागिदारी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. दिपकने नाबाद 69 तर भुवनेश्वरने नाबाद 19 धावा केल्या.

द्रविडचा कानमंत्र आणि दिपक चहरने सामना दिला जिंकून, जाणून घ्या काय होता ‘तो’ मेसेज

पृथ्वी शॉ, ईशान किशन, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, मनिष पांडे आणि कृणाल पांड्या यांना 200 च्या आत बाद केल्याने श्रीलंकेचा संघ आणि प्रशिक्षक उत्साही होते. सामना हातात आला असे वाटत असताना दिपक चहर याने दमदार फलंदाजी करत श्रीलंकेला पराभवाची वाट दाखवली. सामना संपल्यांतर श्रीलंकेचे प्रशिक्षक मिकी आर्थर मैदानात आले आणि कर्णधार दासून शनाका याच्यावर भडकले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात दासूनच्या निर्णयावर आर्थर नाराज असल्याचे दिसत आहेत. तर दासून आर्थन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. परंतु आर्थर रागारागात मैदानातून बाहेर निघून जातात.

आपली प्रतिक्रिया द्या