हिंदुस्थानच्या दबावामुळे श्रीलंकन क्रिकेटपटूंची माघार, पाकिस्तानी मंत्र्याच्या उलट्या बोंबा

श्रीलंका संघातील दहा क्रिकेटपटूंनी सुरक्षेच्या कारणाकरून पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास नकार दिला. मात्र पाकिस्तानने श्रीलंकन खेळाडूंच्या या निर्णयासाठीही हिंदुस्थानलाच जबाबदार धरले आहे. हिंदुस्थानने धमकावले म्हणूनच श्रीलंकन क्रिकेटपटूंनी पाकिस्तान दौर्‍यातून माघार घेतली अशा उलट्या बोंबा पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी ठोकल्या आहेत.

फवाद चौधरी म्हणाले, ‘तुम्ही पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाऊ नका, असे श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना हिंदुस्थानकडून सांगितले जात आहे. तुम्ही पाकिस्तान दौर्‍यातून माघार घेतली नाही तर तुमची आयपीएलमधून हकालपट्टी केली जाईल असे हिंदुस्थानकडून श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावण्यात आल्याचे मला क्रीडा समालोचकांकडून समजले आहे हे खुप दुर्दैवी होय. क्रीडा किभागापासून ते अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेपर्यंत हिंदुस्थानच्या कट्टरतेचा निषेध केलाच पाहिजे असे बिनबुडाचे आरोप फवाद चौधरी यांनी केले.

श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंपैकी टी-20 कर्णधार लसिथ मलिंगा एकदिवसीय कर्णधार दिमुथ करुणारत्ने, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्युज, निरोशन डिककेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्क्हा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तान दौर्‍यातून माघार घेतली आहे. खेळाडूंच्या कुटुंबीयांनी खेळाडूंच्या सुरक्षेबद्दल चिंता क्यक्त केली असल्याची माहिती श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो यांनी दिली. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाच्या पाकिस्तान दौर्‍याबाबत अद्यापि संभ्रमाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या