यजमान श्रीलंकेने तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानविरुद्धची वन डे क्रिकेट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तिसऱया व निर्णायक सामन्यात श्रीलंकने हिंदुस्थानचा 110 धावांची धुव्वा उडवित तीन सामन्यांची मालिका 2-0 फरकाने जिंकली. मालिकेतील पहिला सामना टाय झाला होता. 96 धावांची खेळी करणारा अविष्का फर्नांडो या सामन्याचा मानकरी ठरला, तर ‘मालिकावीरा’चा बहुमान दुनिथ वेललागे याला मिळाला. श्रीलंकेकडून मिळालेल्या 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव केवळ 26.1 षटकांत 138 धावांतच गारद झाला. रथी-महारथी फलंदाजांनी जसलेल्या हिंदुस्थानची पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फिरकी घेतली.