लहान मुलाला जबरदस्ती ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायला लावल्या, बजरंग दलाच्या नेत्याविरोधात तक्रार

997

कर्नाटकात एका बजरंग दलाच्या नेत्याविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. अल्पवयीन मुलाला धमकावून, मारहाण करून जबरदस्ती ‘जय श्री राम’ च्या घोषणा द्यायला लावल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ तालुक्यामध्ये हा प्रकार घडला आहे. ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे नाव दिनेश असे आहे. दिनेशसोबतच तीन अल्पवयीन मुलांविरोधातही पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे मात्र या घटनेचा व्हिडीओ बराच व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळाले. या मुलाला त्याचे पालक पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते, आणि त्यामुळे ही तक्रार नोंदवून घेण्यात आली. सुरूवातीला हा मुलगा घाबरला होता त्यामुळे त्याने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुलाने धीर एकवटून सगळा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला.

दिनेश आणि त्याच्या तीन अलपवयीन साथीदारांनी या मुलाला एका मैदानात पकडला. त्याला जीवे मारण्याची धमकी देत ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायला लावल्या. या चौघांनी मुलाकडे असलेले पैसेही हिसकावून घेतले असे तक्रारीत म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या