‘झलक दिखला जा’च्या १०व्या पर्वाचं परीक्षण करणार ‘हवाहवाई’

31

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरचा डान्स रियालिटी शो झलक दिखला जाचं १०वं पर्व येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. झलकच्या या पर्वासाठी परीक्षक म्हणून बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवी दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांना श्रीदेवी ही परीक्षक म्हणून हवं असण्याचं प्रमुख कारण ती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून एक एव्हरग्रीन आयकॉन आहे, असं सांगण्यात येत आहे. याचा फायदा शोच्या टीआरपीला होणार आहे.

झलक दिखला जाची सगळी पर्वं वेगवेगळ्या कारणांसाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहेत. जुही चावला, शिल्पा शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित यांनीही झलकच्या परीक्षकाची भूमिका पार पाडली असून आता प्रथमच श्रीदेवी परीक्षण करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या