श्रीनगर हायवेवर पुलाखाली आयईडी सापडल्याने खळबळ, मोठा घातपात टळला

1148

जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर एका पुलाखाली आयईडी स्फोटकं सापडल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट 2019मध्ये जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. त्याला वर्ष पूर्ण होत असताना दहशतवादी 5 ऑगस्ट रोजीच एखाद्या मोठ्या घातपाताची योजना करू शकतात. त्यामुळे गुप्तचर संस्था सतर्क झाल्या असून जम्मू-कश्मीरमध्ये सगळीकडे शोधमोहीम राबवली जात आहे. श्रीनगर येथे तत्काळ प्रभावाने कर्फ्यूही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे चार आणि पाच ऑगस्ट रोजी येथे कडकडीत बंद असेल.

दरम्यान, अशीच शोधमोहीम राबवत असताना सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीला श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आयईडी स्फोटकं सापडली आहेत. येथील टप्पर पट्टन पेट्रोल पंपानजिक असलेल्या एका छोट्या पुलाखाली ही स्फोटकं लावण्यात आली होती. बॉम्बशोधक पथकाने त्वरित हालचाल करून ही स्फोटकं निकामी केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या