श्रीनगरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

सुंजवान येथील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच श्रीनगरच्या करन नगर येथील सीआरपीएफच्या कॅम्पवर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दहशतवादी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याच्या तयारीत होते, मात्र जवानांनी त्यांना रोखलं. त्यानंतर दहशतवादी एका इमारतीत लपल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

दहशवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती पहाटे ४ वाजता सुरक्षायंत्रणांना मिळाली. दोन दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याचे कळताच सुरक्षायंत्रणांनी या परिसराला घेरलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला, या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला. जवानांनी परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. अजूनही या परिसरात कारवाई सुरू आहे.

याआधी शनिवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर हल्ला केला होता. यात पाच जवान शहीद झाले असून एक नागरिक ठार झाला आहे. तर ९ हून अधिक स्थानिक जखमी झाले आहेत. ३० तास चाललेल्या या चकमकीत जवानांनी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुंजवान आणि करन नगर दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाने स्वीकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या