खडतर ‘रॅम’ सायकल स्पर्धा, अमेरिकेत नाशिककरांनी फडकविला तिरंगा

14

सामना प्रतिनिधी,नाशिक

जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेल्या रेस अक्रॉस अमेरिका (रॅम)मध्ये नाशिककरांनी अभूतपूर्व यश मिळवित अमेरिकेत हिंदुस्थानचा तिरंगा फडकविला. वाळवंटातील रणरणते ऊन, बर्फाच्छादीत पर्वतरांगांतील गोठवणारी थंडी, पठारावरचे घोंगावणारे वादळ असे टप्प्याटप्प्यावरील निसर्गाचे आव्हान झेलत ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करीत सांघिक गटात सह्याद्री ग्रुपने नववे, तर वैयक्तिक गटात आर्टिलरी सेंटरमधील लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी ७वे स्थान मिळविले. वैयक्तिक गटात जिंकलेले गोकुलनाथ हे पहिले हिंदुस्थानी ठरले असून, या पाचही विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत खडतर समजली जाणारी ही स्पर्धा अमेरीका खंडातील पश्चिम टोकापासून सुरू होवून पूर्वेच्या टोकाला संपते, हे ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करताना १२ राज्यातून प्रवास होतो. यात तीन पर्वतरांगा, दोन वाळवंट व चार नद्या येतात, एक लाख ७० हजार फूट उंच इतकी चढाई करावी लागत असल्याने ही स्पर्धा पूर्ण करणेही आव्हानात्मक आहे.

यंदा नाशिकचे डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील, युरोपात असलेले मूळ नाशिककर डॉ. संदीप शेवाळे व मुंबईचे पंकज मारलेशा यांच्या सह्याद्री ग्रुपने चार सदस्यीय गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व

 लेफ्टनंट कर्नल गोकुलनाथ पहिले हिंदुस्थानी

नाशिकच्या आर्टिलरी सेंटर येथील लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी वैयक्तिक गटात विजय मिळविला. ४ हजार ८०० किलोमीटर अंतर त्यांनी निर्धारीत वेळेपेक्षा आधी म्हणजे ११ दिवस १८ तास, ४५ मिनिटांत पूर्ण केले. रविवारी रात्री ८.३० वाजता त्यांनी स्पर्धा पूर्ण करीत सातवे स्थान पटकाविले. हे यश मिळविणारे ते पहिले हिंदुस्थानी असून त्यांनी स्पर्धेत इतिहास रचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या